
सहकार व बँकीग क्षेत्रात उत्तम व दर्जेदार सेवा देणा-या सहकारी बँकेस देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा बँको ब्लू रिबीन पुरस्कार २०२३ (ठेवी रु. १२५० ते रु.१५०० कोटी असलेल्या देशातील नागरी सहकारी बँकांमधून द्वितीय क्रमांक) दिनांक ०५.१०.२०२३ रोजी दमन येथे भारतीय रिझर्व बँकेचे निवृत्त सीजीएम माननीय पी. के. अरोरा यांचे शुभहस्ते व बैंकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे तसेच अशोक नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
बँकेच्या वतीने सदर पुरस्कार अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, सर्वश्री संचालक श्री बबनराव भेगडे, सीए जनार्दन रणदिवे, श्री श्रीधर गायकवाड, श्री सुभाष नडे, श्री बिपीनकुमार शहा, डॉ. रमेश सोनावणे, श्री सुभाष गांधी, श्री विश्वनाथ जाधव, श्री संजीव असवले यांनी स्विकारला.

देशातील सर्व सहकारी बँकांच्या अंब्रेला संघटनासाठी निर्मित नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अॅण्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि., च्या उद्घाटन प्रसंगी दिल्ली येथे आयोजीत कार्यक्रमासाठी उपस्थित बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, अॅड. सुभाष मोहिते, अंब्रेला ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ज्योतीद्र मेहता नॅफकबचे उपाध्यक्ष सीए मिलिंद काळे आदी मान्यवर सदर कार्यक्रमास केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शहा हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
मुंबई येथे नॅफकब व बी टू बी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२.०४.२०२४ रोजी मुंबई येथे आयोजीत ८ व्या अखिल भारतीय नागरी परिषदेमध्ये बँकेस प्रदान करण्यात आलेला " बेस्ट मल्टीस्टेट अर्बन को- ऑप. बँक पुरस्कार " स्विकारताना बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, सर्वश्री संचालक अॅड. सुभाष मोहिते, सुभाष गांधी, विश्वनाथ जाधव, सौ. निशा करपे, संजीव असवले, स्वीकृत संचालक श्री कालिदास शेलार, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री अरुण डहाके, श्री राजेंद्र गांगर्डे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) श्री संजय भोंडवे व मान्यवर.





