
पुणे शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २६/११ च्या दहशतवादी हल्लातील शहीदांचे स्मरणार्थ चित्रकाला स्पर्धा २०२३ चे आयोजन सारसबाग पुणे येथे करण्यात आले होते. याप्रसंगी विविध शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना बँकेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले, सदर प्रसंगी उपस्थित मा पोलिस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष- श्री मिलिंद वाणी व इतर मान्यवर.

लोकशाही मराठी चॅनल मार्फत मुंबई येथे आयोजित “ सहकार उद्योग संवाद परिषदेमध्ये " सहभागी बँकेचे अध्यक्ष - अॅड. सुभाष मोहिते, जेष्ठ संचालक सीए जनार्दन रणदिवे व जेष्ठ राजकीय नेते मा. श्री. शरदचंद्र पवार सोो व इतर मान्यवर.

८ मार्च, २०२४ " जागतिक महिला दिनाचे "

१४ ते २० नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजीत जागतिक सहकार दिनांचे औचित्य साधुन सहकार ध्वजाचे अनावर करताना व सहकार विषय प्रबोधन करताना बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, संचालक सर्वश्री मिलिंद वाणी, सुभाष नडे, विश्वनाथ जाधव, सौ. निशा करपे, संजीव असवले व अधिकारी - सेवक वृंद.

नाशिक येथे नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक २६ ते २७ जानेवारी २०२४ रोजी आयोजीत सहकार परिषदेमध्ये सहभागी बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष श्री मिलिंद वाणी, सर्वश्री संचालक अॅड सुभाष मोहिते, सुभाष नडे, श्रीधर गायकवाड, बिपीनकुमार शहा, डॉ. रमेश सोनवणे, सुभाष गांधी, सौ. निशा करपे, संजीव असवले, विश्वनाथ जाधव बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री अरुण डहाके, राजेंद्र गांगर्डे व अंब्रेला ऑर्गनायझेशचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता व मान्यवर.

सुलभ व सुखद ग्राहक सेवेसाठी बँकेच्या तळेगांव शाखेचे स्वमालकीच्या प्रशस्त, सुविधायुक्त जागेत स्थलांतर कार्यक्रम दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ साठी उपस्थित बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, सर्वश्री संचालक अॅड. सुभाष मोहिते, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा, डॉ. रमेश सोनवणे, सौ. निशा करपे, संजीव असवले, स्वीकृत संचालक श्री कालिदास शेलार, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य श्री कौस्तुभ भेगडे, श्री अरुण डहाके, शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री सारंग शहापूरकर व मान्यवर खातेदार श्री रामदास काकडे व इतर सदर प्रसंगी सत्यनारायण महापूजा व ग्राहक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बँकेचा ७२ वा वर्धापनदिन वसंत पंचमी दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दिमाखात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी उपस्थित बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, सर्वश्री संचालक अॅड. सुभाष सुभाष मोहिते, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा, श्रीधर गायकवाड, विश्वनाथ जाधव व बोर्ड ऑफ मॅनजमेंटचे सदस्य श्री राजेंद्र गांगर्डे व बँकेचे अधिकारी सेवक.

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठीच्या सेवक वेतन करार संपन्न करताना बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष श्री मिलिंद वाणी, सर्वश्री संचालक वैशाली छाजेड व सेवक असोसिएशनचे अध्यक्ष श्री संदीप आंग्रे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) श्री विजयकुमार शेळके सदर करारानुसार किमान रु.२२८५/- ते कमाल रु.११.७८१/- इतकी मासिक वेतनवाढ सेवकांना देण्यात आली. तसेच गृहकर्ज ५.००% दराने तर इतर कर्जे सवलतीच्या दराने देण्याची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर बँकींग क्षेत्राशी संबंधीत उच्च शिक्षणकालावधी किंवा २ वर्षासाठी सेवेवर लीन ठेवुन परदेशामध्ये शिक्षण घेण्याची संधी करारामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय रु.१० लाखाचा अपघातील विमा, रु.३.०० लाखाची कौटुंबिक मेडीक्लेम पॉलिसी आदी सुविधा कराराद्वारे सेवकांना प्रदान करण्यात आल्या आहेत.


